शुभम लुटे
नारंगी सारंगी धरणाच्या वर सुरू असलेल्या मुसळधार पावसाने नारंगी धरणातून 5 दरवाजे उघडून 1500 क्युसेक वेगाने पाणी सोडण्यात आले त्यामुळे धरण परिसरातील भिल्ल वस्ती दत्तवाडी येवला नाका पूल हा परिसर संपूर्ण पाण्याखाली गेला आहे
प्रशासनाने या परिसरातील रहिवाशांना मंगल कार्यालयामध्ये हलवण्यात आले आहे अनेक नागरिकांचे संपूर्ण घरे पाण्यामध्ये वाहून गेले आहे
पाण्याचा वेग इतका आहे की नांदगाव जवळील अनेक गावांना जोडणारा पूल वाहून गेला आहे त्यामुळे लाख खंडाळा पानवी सुरेगाव जरूळ या गावांचा संपर्क तुटला आहे
भिल्ल वस्तीतील लोकांना प्रशासनाने इतरत्र हलवण्याचे आदेश दिले आहेत
डॉक्टर दिनेश परदेशी आ रमेश बोरणारे उपविभागीय अधिकारी अरुण जराड तहसीलदार सुनील सावंत मुख्याधिकारी भागवत भिगोत व नगरपालिका कर्मचारी यांनी नागरिकांना हलवण्यासाठी मदत केली रात्री बारा वाजेपासून सर्व प्रशासन अलर्ट मोड वर आहे
पावसाचा जोर असाच सुरू राहिल्यास पाण्याचा अजून वेगाने विसर्ग करण्यात येईल असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे